आपला जिल्हा

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान पुरस्कार सोहळा अध्यक्षपदी डॉ नंदकुमार राऊत तर उद्घाटकपदी प्रा. दादासाहेब कोते 

 शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान पुरस्कार सोहळा अध्यक्षपदी डॉ नंदकुमार राऊत तर उद्घाटकपदी प्रा. दादासाहेब कोते 

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान पुरस्कार सोहळा अध्यक्षपदी डॉ नंदकुमार राऊत तर उद्घाटकपदी प्रा. दादासाहेब कोते 

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २२ मे २०२६ : तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय पाचव्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्यासाठी अध्यक्षपदी नाशिक येथील जेष्ठ साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत यांची तर उद्घाटकपदी लोणी, जि. अहिल्यानगर येथील जेष्ठ साहित्यिक प्रा. दादासाहेब कोते यांची निवड झाली असल्याचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. संजय वाघ तसेच प्रतिष्ठानचे सचिव मा. राजेश वाघ यांनी कळविले आहे.

जाहिरात

येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृती राज्यस्तरीय पाचव्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कवी, लेखक, कथाकार यांच्या साहित्य कलाकृतीला राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार नुकतेच १ मे २०२६ रोजी जाहीर झाले आहेत. निवड झालेल्या कलाकृतीचा पुरस्कार प्रदान सोहळा येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथे दि. ४ जून २०२६ रोजी संपन्न होणार आहे . या सोहळ्यासाठी शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानने अध्यक्षपदी नाशिक येथील जेष्ठ साहित्यिक डॉ नंदकुमार राऊत यांची तर उद्घाटकपदी लोणी, ता. राहता जि. अहिल्यानगर येथील जेष्ठ साहित्यिक तथा पाठ्यपुस्तकातील कवी प्रा. दादासाहेब कोते यांची निवड केल्याबाबत प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. संजय वाघ आणि सचिव मा. राजेश वाघ पत्राव्दारे लेखी कळविले आहे.

जाहिरात

सोहळ्याचे अध्यक्ष मा. डॉ. नंदकुमार राऊत यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून निवड होऊन ते सध्या मुबई येथे मंत्रालयात अवर सचिव पदावर कार्यरत आहेत. त्यांना सामाजिक, मानवतावाद, साहित्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल कॅलिफोर्निया रिपब्लिक विद्यापीठाकडून डि. लीट पदवी मिळालेली आहे. डॉ राऊत यांनी २०२५ मध्ये ठाणे येथे भरलेल्या मराठी साहित्य मंडळ आयोजित संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक शिबीर, मेळावे यात त्यांनी मार्गदर्शनपर प्रबोधनात्मक विचार, व्याख्याने दिली आहेत. त्यांचे दौशाड हे आत्मचरित्र संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. डॉ राऊत याआधी अनेक राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून राहिले आहेत. त्यांचे दौशाड आणि केंजाळ अशी साहित्य संपदा प्रकाशित आहे.

जाहिरात

सोहळ्याचे उद्घाटक मा. प्रा. दादासाहेब कोते यांची साहित्य संपदा मोठी आहे त्यांचे चंद्रगाणी, फुला- मुलांच्या कविता, मॉडर्न मराठी पोएट्री खंड ६ मध्ये एका कवितेचा इंग्रजी अनुवाद अशा कलाकृती प्रकाशित असून बालभारती – ई.२ रीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात फुलपाखरू कविता आणि सुलभभारती – ई.३ रीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात झोका कविता अभ्यासक्रमासाठी समाविष्ट आहे . प्रा. कोते यांचे अनेकवेळा आकाशवाणी अहिल्यानगर आणि आकाशवाणी पुणे केंद्रावर कवितावाचन आणि बालकथावाचन झाले आहे. डॉ नंदकुमार राऊत व प्रा. दादासाहेब कोते यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे

मा अध्यक्ष – डॉ नंदकुमार राऊत,
उद्घाटक मा. दादासाहेब कोते

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे