सोमैया विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका डॉ. सुनिता पारे यांना जिल्हास्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार

सोमैया विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका डॉ. सुनिता पारे यांना जिल्हास्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार
सोमैया विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका डॉ. सुनिता पारे यांना जिल्हास्तरीय ‘आदर्श मुख्याध्यापक’ पुरस्कार

Kopargaon vijay kapse दि २३ जुलै २०२६: महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक महामंडळ संलग्न अहिल्यानगर जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ सोमैया विद्यामंदिर, साकरवाडीच्या मुख्याध्यापिका डॉ. सुनिता पारे यांना प्रदान करण्यात आला.
अहिल्यानगर येथे आयोजित जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण समारंभात प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. सर्जेराव निमसे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. पारे यांनी हा सन्मान स्वीकारला.

मुख्याध्यापिका म्हणून विद्यार्थीकेंद्री शिक्षण, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, नावीन्यपूर्ण उपक्रम, शिक्षक-पालक समन्वय, मूल्याधिष्ठित शिक्षण तसेच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. त्यांच्या नेतृत्वाखाली सोमैया विद्यामंदिरने शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि सहशालेय क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत परिसरात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष समीर सोमैया, सचिव सुहास गोडगे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांनी डॉ. पारे यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

डॉ. पारे यांना प्राप्त झालेल्या या प्रतिष्ठेच्या सन्मानामुळे सोमैया विद्यामंदिरच्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक कार्याचा जिल्हास्तरावर गौरव झाला असून संस्थेच्या शैक्षणिक परंपरेत आणखी एका मानाच्या शिरपेचाची भर पडली आहे. त्यांच्या या यशाबद्दल परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून हा पुरस्कार शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
“आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार हा केवळ माझा वैयक्तिक सन्मान नसून सोमैया विद्यामंदिरच्या संपूर्ण शिक्षकवृंद, विद्यार्थ्यांचा, पालकांचा आणि संस्था व्यवस्थापनाच्या सामूहिक प्रयत्नांचा गौरव आहे. गुणवत्तापूर्ण व मूल्याधिष्ठित शिक्षणासाठी आमची वाटचाल यापुढेही अधिक जोमाने सुरू राहील.”
— डॉ. सुनिता पारे, मुख्याध्यापिका, सोमैया विद्यामंदिर, साकरवाडी


