आपला जिल्हा

सह्याद्रीच्या पर्जन्यछायेतील दुष्काळी भागाला पावसाळ्यात पाटाचे पाणी द्या; कोपरगाव काँग्रेसचे मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

सह्याद्रीच्या पर्जन्यछायेतील दुष्काळी भागाला पावसाळ्यात पाटाचे पाणी द्या; कोपरगाव काँग्रेसचे मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

सह्याद्रीच्या पर्जन्यछायेतील दुष्काळी भागाला पावसाळ्यात पाटाचे पाणी द्या; कोपरगाव काँग्रेसचे मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्र्यांना निवेदन

जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २८ जुलै २०२६: सह्याद्री पर्वताच्या पर्जन्यछायेतील अहिल्यानगर, मान-दहिवडी (सातारा), सुपा (पुणे) तसेच अन्य दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात कालव्याद्वारे पाटाचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष कायदेशीर धोरण आखावे, अशी मागणी कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात पावसाळ्यात उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त (फ्लड/सरप्लस) पाण्याचे नियोजन करून ते पर्जन्यछायेतील दुष्काळी भागाकडे वळविण्याची मागणी करण्यात आली आहे.

जाहिरात

निवेदनात म्हटले आहे की, हा संपूर्ण परिसर पर्जन्यछायेचा असल्याने येथे मान्सूनचा पाऊस अत्यल्प पडतो. परतीच्या पावसावरच शेती अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार येथील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडले जाते. मात्र, पावसाळ्यात स्थानिक नद्या, नाले आणि कालव्यांमध्ये मुबलक पाणी उपलब्ध असतानाही या दुष्काळी भागाला पाटाचे पाणी दिले जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

जाहिरात

कायदेशीर नियमावली करून पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी या भागाला उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. तसेच कालव्यांद्वारे पाणी सोडून तलाव, विहिरी आणि बंधारे भरून घेण्यासाठी ठोस धोरण तातडीने राबवावे, अशीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी नितीन शिंदे, कैलास पंडोरे पैलवान, हाशमभाई पटेल, सचिन होन, विष्णू पाडेकर, ज्ञानेश्वर भगत, राहुल गवळी, सोमनाथ पगारे, सोपान धेणक, सुभाष रणधीर, रौनक अजमेरे, पुष्पा भगत, राजुभाई पठाण, महादेव नाना जगताप, बाळासाहेब शिंदे, मयुर आव्हाड, ॲड.  शीतल देशमुख, ॲड. ऋषीकेश पोकळे, मझर शेख, मोहम्मद शेख, चंद्रहार जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
जलसंपदा मंत्र्यांनी या गंभीर प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहून पावसाळ्यातील अतिरिक्त पाण्याच्या नियोजनाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीने व्यक्त केली आहे.

नितीन शिंदे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे