एकविराकडून गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावासह मदत कार्य
३०० स्वयंसेवक गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी मदत करणार
संगमनेर प्रतिनिधी दि १६ सप्टेंबर २०२४– संगमनेर शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहाने गणेशोत्सव साजरा होत असून शहरातील नागरिकांनी स्थापन केलेल्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याकरता कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एकविरा फाउंडेशनच्या वतीने कृत्रिम तलाव करण्यात आले असून विसर्जनाकरता एकविराचे 300 सदस्य मदत कार्यात सहभागी होणार आहेत.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात मोठ्या उत्साहाने गणेश उत्सव या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन झाले असून अत्यंत सुंदर देखावे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे शहर व ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात नागरिकांनी या गणेश मंडळांना भेटी दिल्या. आमदार थोरात यांनीही या सर्व गणेश मंडळाने भेटी देत आरत्यांमध्ये सहभाग घेतला.
मागील पाच वर्षांपासून एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून गणेश विसर्जन काळामध्ये निर्माल्य संकलन केले जात आहे. व या निर्मल्याची व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते. याचबरोबर कृत्रिम तलावांची निर्मिती करून गणेश विसर्जन केले जाते. यातून पर्यावरण संवर्धन व स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. यावेळी जाणता राजा मैदान व पेखळे मळा या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. याचबरोबर प्रवरा नदी काठी दुर्घटना टाळण्यासाठी बॅरिकेटिंग करण्यात आली आहे.
या प्रसंगी डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, मोठ्या आनंदात आणि धामधुमीमध्ये सर्वांनी गणेशोत्सव साजरा केला.मात्र गणेश विसर्जन काळामध्ये सर्वांनी निर्माण संकलन हे एकत्र करावे. जेणेकरून सर्व परिसर स्वच्छ राहील .याकरता सदस्य काम करणार आहेत. याचबरोबर तरुणांनी अति उत्साह न दाखवता खोल पाण्यात कुणीही जाऊ नये तसेच नदीकाठी काळजी घ्यावी.
गणेश विसर्जनाच्या दिवशी संगमनेर शहर व नदीकाठी 300 युवक व युवती स्वयंसेवक म्हणून काम करणारा असून ते निर्माल्य संकलन करणार आहेत. याचबरोबर या सर्व निर्माल्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणार आहेत.याचबरोबर खोल पाण्यामध्ये नागरिकांना जाऊ न देता गणेश मूर्ती विसर्जनासाठी मदत करणार आहेत.