आपला जिल्हा

खडकीत ‘रोजगार मंदिर’चा शुभारंभ; सुहासिनी कोयटे यांच्या पुढाकारातून महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग

खडकीत ‘रोजगार मंदिर’चा शुभारंभ; सुहासिनी कोयटे यांच्या पुढाकारातून महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग
खडकीत ‘रोजगार मंदिर’चा शुभारंभ; सुहासिनी कोयटे यांच्या पुढाकारातून महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग
जाहिरात

Kopargaon vijay kapse दि २० मार्च २०२६ : सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना रोजगार मिळावा या उद्देशाने खडकी परिसरात पहिले ‘रोजगार मंदिर’ कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे. कोपरगाव शहरातील प्रत्येक प्रभागात समता महिला बचत गटाच्या माध्यमातून अशा प्रकारची रोजगार मंदिरे सुरू करण्याचा मानस समता महिला बचत गटाच्या अध्यक्षा  सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांनी व्यक्त केला.

जाहिरात
कोपरगाव शहरातील खडकी परिसरात समता महिला बचत गटाच्या माध्यमातून परिसरातील महिलांसाठी रोजगार निर्मितीच्या उद्देशाने ‘रोजगार मंदिर’चा शुभारंभ समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे व सौ. सुहासिनी ओमप्रकाश कोयटे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आला. यावेळी महिलांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

जाहिरात
त्या पुढे म्हणाल्या की, पुष्पाताई काळे प्रियदर्शनी महिला मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून महिलांना सक्षम बनविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या विचारांना चालना देत पुढील काळात अशा रोजगार मंदिरांची उभारणी अधिक व्यापक स्वरूपात करण्यात येणार असल्याचा मानस समता महिला बचत गटाचा आहे.

जाहिरात
या रोजगार मंदिरांमध्ये अगरबत्ती, कापूर तयार करण्याबरोबरच विविध प्रकारची ५० पेक्षा अधिक उत्पादने तयार करण्यात येणार आहेत. खडकी परिसरातील महिलांना या सर्व उत्पादनांची प्रात्यक्षिकेही दाखविण्यात आली. तसेच ज्या महिलांना स्वतःच्या घरातून व्यवसाय करायचा आहे, त्यांना घरच्या घरी काम करून रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या रोजगार मंदिराच्या माध्यमातून तयार होणाऱ्या उत्पादनांचा दर्जा उत्कृष्ट राखला जाईल, अशी ग्वाही देखील सौ.सुहासिनी कोयटे यांनी दिली.
यावेळी समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, नगरसेवक संदीप कपिले, सोमेश आढाव, सामाजिक कार्यकर्ते महेश गोसावी, संदीप जगझाप, समता महिला बचत गटाचे व्यवस्थापक विजय गोयल तसेच राष्ट्रवादी महिला जिल्हा आघाडीच्या अध्यक्षा रेखा जगताप यांच्यासह खडकी परिसरातील बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे