ॲड. संदीप वर्पे यांना महाविकास आघाडी कडून कोपरगावात उमेदवारी जाहीर
ॲड. संदीप वर्पे यांना महाविकास आघाडी कडून कोपरगावात उमेदवारी जाहीर
ॲड. संदीप वर्पे यांना महाविकास आघाडी कडून कोपरगावात उमेदवारी जाहीर

कोपरगाव विजय कापसे दि २४ ऑक्टोबर २०२४–गेल्या अनेक दिवसापासून बहुचर्चित कोपरगाव विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी मधील कोणत्या पक्षाला सुटेल या चर्चेने संपूर्ण कोपरगाव तालुका ढवळून निघाला असताना आज संध्याकाळी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत यात कोपरगाव विधानसभा मतदार संघाकरीता महाविकास आघाडीकडून ॲड. संदीप वर्पे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी जाहीर केली आहे.

ॲड. संदीप वर्पे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार साहेब व खासदार सुप्रिया सुळे यांचे अत्यंत निकटवर्तीय तसेच अभ्यासू,हुशार, प्रत्येक प्रश्नांच्या मुळापर्यंत जात त्याचे निरसन करणारे म्हणून संदीप वर्पे यांच्याकडे पाहिले जाते. ते सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष असून ते एक उच्च विद्याविभूषित देखील आहे.
