एस. एस. जी. एम. महाविद्यालयात सुशीलामाई काळे राज्यस्तरीय भव्य आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
एस. एस. जी. एम. महाविद्यालयात सुशीलामाई काळे राज्यस्तरीय भव्य आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा

कोपरगाव विजय कापसे दि १७ डिसेंबर २०२५: रयत शिक्षण संस्थेचे, श्री सदगुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे सौ.सुशीलाबाई उर्फ माईसाहेब शंकररावजी काळे यांच्या स्मरणार्थ ऑनलाइन आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा शुक्रवार दि.२ जानेवारी व शनिवार दि. ३ जानेवारी २०२६ आयोजित केली आहे.या स्पर्धेचे हे २५ वे वर्ष आहे. सहकार, शिक्षण, समाजकारण, शेती आणि जलसिंचन क्षेत्रात भरीव कार्य करणारे राज्याचे सहकार व शिक्षण मंत्री पद भुषविलेले रयत शिक्षण संस्थेचे १५ वर्षे चेअरमन उपाध्यक्ष, माजी खासदार व को.सा.का. उद्योग समूहाचे शिल्पकार म्हणून स्वर्गीय शंकररावजी काळे अवघ्या महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. कै. सुशिलाबाई (माई) शंकरराव काळे यांचा गौतम एज्युकेशन सोसायटी तसेच शिक्षण क्षेत्राशी अत्यंत जवळचा संबंध होता. माईनीं या महाविद्यालयाशी सतत संपर्क ठेवून कृतिशील जिव्हाळ्याचे नाते निर्माण केलेले होते. तरी त्यांच्या स्मृतीचा सुगंध न संपणारा आहे. हा ‘स्मृती ठेवा पण तिच्या रूपाने उच्च शिक्षण क्षेत्राचा जपावा’ या भावनेने काळे कुटुंबाच्या सहकार्याने भव्य राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेचे ऑनलाईन आयोजन केलेले असून स्पर्धेसाठी आपण महाविद्यालयातील दोन स्पर्धकांचे व्हिडिओ पाठवावे.





