आपला जिल्हा

गव्हाणे दाम्पत्याच्या स्मृतीदिनी अंजनापुरात भागवत कथेचे आयोजन- आरोग्यदूत गव्हाणे

गव्हाणे दाम्पत्याच्या स्मृतीदिनी अंजनापुरात भागवत कथेचे आयोजन- आरोग्यदूत गव्हाणे

गव्हाणे दाम्पत्याच्या स्मृतीदिनी अंजनापुरात भागवत कथेचे आयोजन- आरोग्यदूत गव्हाणे

जाहिरात

कोपरगाव विजय कापसे दि ३ मे २०२५-  कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर येथील कै. बिजलाबाई मारुतीराव गव्हाणे व लोकनेते मारुतीराव सखाराम गव्हाणे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री संत जगद्गुरु जनार्दन स्वामी समाधीस्थान बेट कोपरगावचे मठाधिपती प.पु.रमेशगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शन आशीर्वादाने बुधवार दिनांक ७ मे २०२५ ते मंगळवार दिनांक १३ मे २०२५ या पर्व काळात दररोज सायंकाळी ८ ते १० या वेळेत अंजनापुर येथील म्हसोबा वस्तीवर ह.भ.प परमपूज्य देवगोपाल शास्त्री यांच्या सुश्राव्य वाणीतून भव्य श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आरोग्यदूत आरोग्य दूत बाळासाहेब गव्हाणे यांनी दिली आहे.

जाहिरात

तसेच बुधवार दि १४ मे २०२५ रोजी सायंकाळी सरला बेट गोदावरी धामचे मठाधिपती प.पु महंत रामगिरीजी महाराज यांचे जाहीर हरिकीर्तन होणार असून तदनंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

बाळासाहेब गव्हाणे

या पर्वकाळात प.पु रमेशगिरीजी महाराज,प.पु अरुणनाथ गिरीजी महाराज, १००८ काशीकानंद स्वामी महाराज,१००८ महामंडलेश्वर शालिनीगिरी महाराज, कालिंदीताई उपासनी संस्थान, प.पु संत आत्मा मलिक माऊली व संत परिवार, प.पु रामप्रभू महाराज, ह.भ.प कीर्तनकेसरी पांडुरंगगिरीजी महाराज, ह.भ.प बबन महाराज गाडेकर, ह.भ.प भास्कर महाराज गव्हाणे, ह.भ.प चांगदेव महाराज ढेपे, ह.भ.प बबन महाराज गव्हाणे सर्व संत मंहतांची उपस्थिती तर मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.

जाहिरात

तसेच माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील माजी, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे,शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने, कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल खताळ, शिर्डी चे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते,तुषार गोंदकर, गोपीनाथ गोंदकर, शिर्डीचे पोलीस निरीक्षक रंणजीत गलांडे, शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन औताडे, नाशिक जिल्हा परिषदेच्या सदस्य सीमंतनी कोकाटे, शिर्डीचे माजी नगराध्यक्ष अभय शेळके, शिर्डी संस्थांनचे उपकार्यकारी अधिकारी भीमराव दराडे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

जाहिरात

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे