रस्त्यांसाठी ग्रामस्थांनी उपसले उपोषणाचे हत्यार; ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद

रस्त्यांसाठी ग्रामस्थांनी उपसले उपोषणाचे हत्यार; ग्रामस्थांचा उस्फुर्त प्रतिसाद

Kopargaon vijay kapse दि २० जुलै २०२६: मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ओगदी ते करंजी बु. या ३.४०० किलोमीटर रस्त्याचे काम भूमिपूजनानंतरही अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम पूर्णपणे रखडले असून मोठमोठे खड्डे, चिखल आणि पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर रखडलेले काम तात्काळ सुरू करून दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावे, कामातील विलंबास जबाबदार अधिकारी व ठेकेदारावर कठोर कारवाई करावी आणि नागरिकांना सुरक्षित रस्ता उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी ग्रामस्थांनी दि. २० जुलै २०२६ पासून करंजी बु. येथील मारुती मंदिरासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा गावातील युवकांनी तहसीलदार यांना निवेदन देत दिला असता त्यावर कुठलीही कारवाई न झाल्याने आज सोमवार पासून गावातील ग्रामस्थांनी सकाळी ८ वाजेपासून उपोषणाला सुरुवात केली आहे.






