सोमैया महाविद्यालयात ६ फेब्रुवारीला के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
सोमैया महाविद्यालयात ६ फेब्रुवारीला के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
सोमैया महाविद्यालयात ६ फेब्रुवारीला के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा
कोपरगाव विजय कापसे दि ४ फेब्रुवारी २०२६- के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात येथे शुक्रवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘के. बी. रोहमारे स्मृति-करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी येथे दिली.

याप्रसंगी उपस्थित असलेले स्पर्धेचे मुख्य समन्वयक डॉ. जिभाऊ मोरे म्हणाले की, “ही वक्तृत्व स्पर्धा कोपरगावचे माजी आमदार कै. के. बी. रोहमारे यांच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कर्तृत्वाची स्मृती चिरंतन रहावी आणि तरुण पिढीने त्यांपासून प्रेरणा घ्यावी म्हणून गेल्या दहा वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. स्पर्धकांचा उदंड आणि भरभरून प्रतिसाद लाभतो आहे. त्यामुळे या स्पर्धेला राज्यभर प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.

यंदा या स्पर्धेसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 : तारक की मारक, माझा महाराष्ट्र पुरोगामी आहे म्हणे!, लोकशाहीचा आधारस्तंभ : समाज माध्यमे, कृत्रिम बुद्धिमत्ता व मानवी भवितव्य, अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकाराचे अग्रदूत : कै. के. बी. रोहमारे (दादा) असे ज्वलंत विषय ठेवण्यात आलेले आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता जालना येथील अप्पर कोषागार अधिकारी मा. शरद भिंगारे यांच्या शुभहस्ते तसेच कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. स्पर्धकांच्या निवास आणि भोजनाची मोफत व्यवस्था केलेली असून राज्यातील जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन या स्पर्धेचे सहसंयोजक डॉ. रवींद्र जाधव यांनी केले आहे.





