संत गाडगे महाराज जयंती डाऊच गावात वृक्षारोपण व महाश्रमदानाने साजरा
संत गाडगे महाराज जयंती डाऊच गावात वृक्षारोपण व महाश्रमदानाने साजरा
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि २४ फेब्रुवारी २०२६– मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत सोमवार दि २३ फेब्रुवारी रोजी के. जे. सोमय्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील भूगोल विभाग अंतर्गत ग्राम सर्वेक्षण प्रकल्प तसेच संत गाडगेबाबा जयंती निमित्त गावात स्वच्छता करत ग्राम स्वच्छता अभियान व विविध देशी वृक्षांची लागवड करत स्मार्ट ग्राम डाऊच बुद्रुक गावात अनोखा उपक्रम राबविण्यात आला.
जाहिरात
गाव सर्वेक्षण व गृहभेटी दरम्यान भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांनी डाऊच गावातील प्रत्येक घरोघर जाऊन सर्वे करण्यात आला. सर्वे करताना शासनाच्या विविध योजना राबवून गावात करण्यात आलेल्या विकासाच्या योजना व भविष्यात कुटुंबांना कोणत्या योजना किंवा गरजांची आवश्यकता आहे, याचा परिपूर्ण माहिती घेतली.जाहिरात
या उपक्रमात गावचे लोकनियुक्त सरपंच दिनेश गायकवाड, ग्रामविकास अधिकारी विजयसिंह पाटील, जेष्ठ ग्रामपंचायत सदस्य भिवराव दहे,के. जे.सोमय्या महाविद्यालयाचे प्रा. डॉ. गणेश चव्हाण , प्रा डॉ. साळुंके सर, प्रा. सोनवणे सर, प्रा. खंडिझोड मॅडम, प्रा. संपत माळी, प्रा. जाधव मॅडम आदींसह आजी माजी ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व विद्यार्थी सहभागी झाले होते.जाहिरात