गोदामाई प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद-सिने अभिनेते अरबाज
सैराट फेम अभिनेते सल्या ने दिली कोपरगावच्या गोदावरी नदी पात्रात भेट
जाहिरात
कोपरगाव विजय कापसे दि ८ एप्रिल २०२५– कोपरगाव शहरातील आदिनाथ ढाकणे संस्थापक अध्यक्ष असलेले गोदावरी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकस्पद असल्याचे गौरवोउद्गार सैराट फेम चित्रपट अभिनेते सल्ल्या (अरबाज शेख) यांनी कोपरगाव येथील गोदावरी नदीकिनारी रविवार ६ एप्रिल रोजी भेट दिली असताना बोलतांना व्यक्त केले.
जाहिरात
अभिनेते अरबाज शेख यांनी सहपत्नीक रामनवमीच्या दिवशी शिर्डीचे साईबाबा समाधी मंदिर व कोपरगाव येथील जगप्रसिद्ध परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर गोदामाई प्रतिष्ठान तर्फे गेली ३१० आठवड्यापासून स्वच्छता करत असलेल्या गोदावरी नदी किनारा व घाट परिसरास भेट दिली. याप्रसंगी त्यांच्या समवेत पत्नी सिमरन,मित्र अमर, गोदावरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, राज्य पत्रकार संघाचे कोपरगाव तालुका सचिव प्रा.विजय कापसे यांच्या सह गोदामाई प्रतिष्ठानचे गोदासेवक उपस्थित होते.जाहिरात
सिने अभिनेते अरबाज शेख यांनी संपूर्ण गोदामाई प्रतिष्ठान टीमचे कौतुक करताना सांगितले की, नद्या या आपले जीवन असून प्रत्येकाने नदी स्वच्छ ठेवणे हे आपले आद्य कर्तव्य समजून तशी कृती करायला हवी. तसेच शासनाने देखील नद्यांमध्ये सोडले जाणारे मैला, केमिकल युक्त गटारीचे पाणी नद्यांमध्ये न सोडता त्यावर प्रक्रिया करून ते पाणी झाडांना द्यावे किंवा बांधकामांना वापर करावा जेणेकरून नदी प्रदूषित होण्यापासून वाचेल तरी कोपरगाव मध्ये आदिनाथ ढाकणे व त्यांची टीम करत असलेल्या गोदावरी नदी स्वच्छतेत सर्वांनी सहभाग घेत नदी प्रदूषित होण्यापासून वाचवावी असे आवाहन अभिनेते अरबाज शेख यांनी केले.