आपला जिल्हा
शौर्या गिरमेची थ्रीए साइड व्हॉलीबॉल भारतीय संघाच्या कर्णधार पदी निवड; आमदार काळें यांनी दिल्या शुभेच्छा

शौर्या गिरमेची थ्रीए साइड व्हॉलीबॉल भारतीय संघाच्या कर्णधार पदी निवड; आमदार काळें यांनी दिल्या शुभेच्छा
शौर्या गिरमेची थ्रीए साइड व्हॉलीबॉल भारतीय संघाच्या कर्णधार पदी निवड; आमदार काळें यांनी दिल्या शुभेच्छा

कोपरगाव विजय कापसे दि १६ डिसेंबर २०२५– कोपरगाव येथील श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये इयत्ता १० वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेली शौर्या रणजित गिरमे हिने १७ वर्षा खालील थ्रीए साइड व्हॉलीबॉल च्या भारतीय संघाच्या कर्णधार पदी धडाकेबाज एन्ट्री मारली. फक्त १५ वर्षाची शौर्याची कामगिरी बघुन सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत व शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. एवढ्या लहान वयात भारतीय संघात महाराष्ट्र राज्यातून निवड झालेली शौर्या एकमेव मुलगी आहे.

लहानपणा पासुनच खेळाची आवड असलेली शौर्या तिची मोठी बहीण तनिष्का रणजित गिरमे सोबत खेळत शौर्याने व्हॉलीबॉल खेळातली चुणूक दाखवली. तसेच पुढे खेळाचे प्रशिक्षक गौरव डेंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर, चिवट व सातत्यपूर्ण सराव केला आणि भारतीय संघात थेट कर्णधार पदा पर्यंत मजल मारली.

काठमांडू, नेपाळ येथे होणाऱ्या सदर स्पर्धेमध्ये कोपरगावची शौर्या कॅप्टन असल्याने कोपरगावची ख्याती जगभर पसरणार आहे. नुकत्याच अंतरराज्य स्पर्धे मध्ये शौर्याने दाखवलेल्या जबरदस्त खेळा मुळे भारताच्या निवड समितीने तिची थेट कर्णधार पदी निवड केली। शौर्याच्या या उत्तुंग यशामागे तिचे आई, वडिल, बहिण तसेच SGFI पार्थ दोशी, गौरव डेंगळे , नितिन बलराज , कुलदीप कोंडे , मारुती हजारे , व्ही एस ए राजू , लक्षय वाधवान , आदींचे मार्गदर्शन लाभले.

शौर्याच्या या यशाबद्दल नुकतेच आमदार आशुतोष काळे यांनी तिचे अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे या प्रसंगी अमोल गिरमे, अजित कोरके, गुरुराज एच पी गॅस चे सर्वेसर्वा विशाल जगताप, डॉ घायतदडकर पाटील डेंटल हॉस्पिटलचे सर्वेसर्वा तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग ५ चे नगरसेवक पदाचे उमेदवार डॉ.कुणाल घायतडकर, राष्ट्रवादी काँग्रेस प्रभाग ५ चे नगरसेवक पदाचे उमेदवार तथा सामाजिक कार्यकर्ते अमित आगलावे, राजेंद्र तिरसे, महेश झोडगे आदि उपस्थित होते.




