आपला जिल्हा

लोकाभिमुख नेतृत्व म्हणजेच श्री राजेंद्र दत्तात्रय सोनवणे

लोकाभिमुख नेतृत्व म्हणजेच श्री राजेंद्र दत्तात्रय सोनवणे

शांत,संयमी अभ्यासु व्यक्तिमत्त्व म्हणून सर्व परिचित

कोपरगाव विजय कापसे दि १ नोव्हेंबर २०२५- गेल्या अनेक वर्षांपासून कोपरगाव शहराच्या राजकारणात, सामाजिक कार्यात आणि लोकसेवेत सातत्याने कार्यरत असलेले नाव म्हणजे श्री राजेंद्र दत्तात्रय सोनवणे उर्फ आर. डी. सोनवणे. जनतेच्या मनाशी नातं जोडणारा, समाजहितासाठी अहोरात्र झटणारा आणि “विकास हीच दिशा” मानणारा असा हा कार्यकर्ता आज कोपरगावच्या प्रत्येक नागरिकाच्या विश्वासाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासाचा दृढ पाया रचण्यात त्यांचा कोल्हे साहेब व आदरणीय बिपिन दादा यांच्या मार्गदर्शनाखाली मोलाचा वाटा आहे. नागरिकांच्या अडचणींचं तत्काळ निराकरण, प्रामाणिक प्रशासन आणि पारदर्शक कामकाज हीच त्यांची ओळख आहे.

श्री सोनवणे हे खेळाडू वृत्तीचे, शांत स्वभावाचे, संयमी पण ठाम निर्णय घेणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. शालेय जीवनात असताना त्यांनी व्हॉलीबॉल या खेळात कोपरगाव शहराचं नाव महाराष्ट्रभर गाजवलं आणि पुणे विद्यापीठाकडून सलग तीनदा मानाचं विजेतेपद मिळवलं.

त्यांचे वडील कैलासवासी डि.के. (अण्णा) सोनवणे हे देखील खेळाडू वृत्तीचे आणि कोल्हे साहेबांचे अतिशय विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात. गोरगरीब जनतेसाठी त्यांनी सलग २५ वर्ष दीपावली निमित्त सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली “इंदिरा मिठाई फराळ” हे दुकान नफा-न-तोटा या तत्वावर चालवलं, ज्यात कुठलाही नफा नाही पण कोल्हे परिवाराचं नाव हे संपूर्ण तालुक्यात या सणानिमित्त व गोरगरीब गरिबांच्या सेवेसाठी कोल्हे परिवार तत्पर आहे हे यामधून कायम दिसत आले आणि आजही शहरातील नागरिक त्या ठिकाणी “डि के अण्णा”चं नाव सन्मानाने घेतात. त्यांच्यानंतर त्यांनी तीन पिढ्यांचा वारसा जपला असून आजही त्यांचे नातू श्री विक्रांत राजेंद्र सोनवणे आणि सिद्धांत राजेंद्र सोनवणे हे विवेक भैय्या कोल्हे यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून कार्यरत आहेत. कोल्हे परिवाराचा कायम या परिवारावर मोठा आधार आणि आशीर्वाद राहिलेला आहे.

श्री आर. डी. सोनवणे यांच्या सुविद्य पत्नी सौ. विद्याताई सोनवणे यांनीही नगरसेवक पदाच्या कार्यकाळात आमदार सौ. स्नेहलताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विकासकामे राबवली, जी शहरात आजही चर्चेत आहेत. विद्याताई स्वतःही कोल्हे ताईंच्या सोबत सतत कार्यरत राहून समाजकार्यात सक्रिय भूमिका बजावत आहेत.

सहकार महर्षी कैलासवासी शंकररावजी कोल्हे यांच्यापासून सुरू झालेलं नातं आजही स्नेह, निष्ठा आणि विश्वासाने टिकून आहे. बिपिनदादा कोल्हे असोत, स्नेहलता ताई कोल्हे असोत, विवेक भैय्या कोल्हे असोत — या सर्व कोल्हे परिवाराशी श्री राजेंद्र दत्तात्रय सोनवणे यांचे अतूट संबंध आहेत. कोल्हे परिवाराच्या शहरातील राजकारणात, समाजकार्यात आणि सहकार चळवळीत एक विश्वासू, समर्पित कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जातात.

2011 च्या नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र जी पाठक, अशोक लकारे, शिवाजी खांडेकर यांसारखे दिग्गज कोल्हे परिवारात सामील करून पक्षाची ताकद वाढविण्यात श्री राजेंद्र दत्तात्रय सोनवणे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्या निवडणुकीत पक्षाचे बलाबल १३–१३ अशा स्थितीत आले असताना, श्रीमती सुरेखा राक्षे ताई या नगराध्यक्षा म्हणून विराजमान झाल्या.

गटनेतेपदाची जबाबदारी श्री सोनवणे यांनी अतिशय तारेवरची कसरत करत सभागृहाचे कामकाज सुरळीत पार पाडले आणि पक्षाची एकजूट कायम राखली. त्यानंतर अडीच वर्षांची मुदत संपल्यानंतर कोल्हे साहेब आणि बिपीन दादांच्या विचाराने आणि मार्गदर्शनाने सौ. ऐश्वर्याताई सातभाई या नगराध्यक्ष झाल्या.आजपर्यंत सातभाई गट हा कोल्हे परिवाराचा दृढ सहकारी गट म्हणून दादा आणि भैय्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत आहे. या संपूर्ण प्रवासात राजेंद्र सोनवणे यांनी संतुलन, संघटन आणि पक्षवाढीच्या दृष्टीने उल्लेखनीय भूमिका बजावली. कोपरगाव शहरात पक्ष बळकट करण्यासाठी आणि कोल्हे परिवाराचा गट अधिक मजबूत करण्यासाठी त्यांचं योगदान मोठे आहे हे म्हणायला वावग ठरणार नाही.

२०१४ च्या विधानसभेच्या निवडणुकीत स्नेहलता ताई कोल्हे यांच्या प्रचारादरम्यान, कोपरगाव शहरातील अनेक राजकीय समीकरणं बदलून टाकण्याचं, विविध नेत्यांना एकत्र आणण्याचं आणि शहराच्या निवडणुकीचा चेहरामोहरा बदलण्याचं काम ज्यांनी केलं, ते म्हणजेच आर. डी. सोनवणे.

याशिवाय, श्री सोनवणे यांचं संघटन कौशल्य शहरभर प्रसिद्ध आहे. गणेशोत्सव, सामाजिक उपक्रम किंवा कोणताही सार्वजनिक प्रसंग असो — विविध संघटना, मंडळं आणि तरुण कार्यकर्त्यांना कोल्हे परिवाराशी जोडून ठेवण्याचं कार्य त्यांनी सातत्याने केलं आहे. आजही तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वाधिक संघटन कौशल्य आणि संपर्क जाळं ज्यांच्याकडे आहे, ते म्हणजे श्री राजेंद्र दत्तात्रय सोनवणे.

कोपरगाव नगरपालिकेच्या आगामी होणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण जाहीर झाल्याने बिपिंनदादा कोल्हे माजी आमदार सौ स्नेहलता ताई कोल्हे युवानेते विवेकभैय्या कोल्हे तसेच पक्ष पक्षश्रेष्ठींकडे ओबीसी प्रवर्गातून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी मिळावी यासाठी राजेंद्र दत्तात्रय सोनवणे यांनी विनम्रपणे विनंती केली आहे

Om Sai 24 News

बातमी शेअर करण्यासाठी खाली क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे